कुदळवाडी शाळेतील संगणक लॅबचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज
पिंपरी, दि. ५- पी.सी. एम. सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी क्र. ८९ शाळेच्या डिजीटल क्लासरूम, संगणक लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय कक्ष आणि RFID आय. कार्ड वितरण सोहळ्याचे उद्घाटन पिं.चिं.म.न.पा.चे अति.आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगिता बांगर, माजी महापौर राहुल जाधव, माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संभाजी बालघरे , विशाल बालघरे, प्रदीप बालघरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय येणारे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा गायकर व सुनिता दिंडे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जुन्या इमारतीची भौतिक परिस्थिती व तेथील वस्तुस्थिती सांगून नवीन इमारतीच्या बांधकामामध्ये माजी महापौर जाधव व दिनेश यादव यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती साठी RFID कार्ड बनविले असून सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती लागणार असून पालकांना विद्यार्थी In / Out झाल्याचे नोटीफिकेशन व दररोजचा Home Work पालकांना जातो. सॉफ्टवेअरमध्ये दाखला, बोनाफाईड, निर्गम उतारा , शाळा प्रवेश फॉर्म, लायब्ररी व्यवस्थापन , रिझल्ट , इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. सर्व विश्वस्त , सा. कार्यकर्ते व प्रशासनाच्या सहकार्यामुळेच एवढी मोठी भव्य शालेय इमारत झाल्याचे नमूद केले.

राहुलदादा जाधव यांनी आपल्या मनोगतात बोलताना शाळेसाठी आमदार साहेबांनी व प्रशासनाने लक्ष घातल्याने सुसज्ज इमारत झाल्याचे नमूद केले.
अति. आयुक्त श्री. प्रदीप जांभळे पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेने केलेल्या कार्याचे गौरोवोदगार काढून शाळेने बनविलेले फर्निचर उत्कृष्ठ दर्जाचे व आवश्यक असल्याचे सांगितले . संगणक लॅब , सायन्स लॅब व ग्रंथालयाची निर्मिती डिझाईनर नेमून केल्याप्रमाणे वाटते तसेच ही शाळा मॉडेल स्कूल तयार करून प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारच्या शालोपयोगी सोयी देण्याचे कबूल केले.
शाळेसाठी रेन हार्वेस्टिंग व प्रशस्त हॉल बनवून देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनाही या वर्षी नवीन ड्रेस डिझायनर कडून तयार करून पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना खाजगी शाळेपेक्षा उत्कृष्ठ गणवेश देणार आहोत असे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन व शिक्षक वृंद यांनी केलेल्या शाळेच्या कार्याबद्दल कौतुक केले.
