पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आय.टी.आय मोरवाडी व पिंपरी चिंचवड शासकीय आय.टी.आय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड, यमुनानगर निगडी पुणे ४११०१९ या संस्थेमध्ये उद्या शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या AVA हॉलमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या (CMYKPY) व शिकाऊ उमेदवारी योजना (PMKVY) अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शिकाऊ उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी मिळणेकामी सर्व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या माजी प्रशिक्षणार्थ्यांनी सदर शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील यापूर्वी उत्तीर्ण झालेले परंतु शिकाऊ उमेदवारी न मिळालेले प्रशिक्षणार्थी व इतर (१२ वी, पदवीकाधारक, पदवी धारक, पदव्युत्तर) नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले आहे.
