पिंपरी, दि. १५ : आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलांना मैदानी खेळ खेळायला वेळ मिळत नाही. त्यासाठी रूपीनगर येथील प्रेरणा योग प्रशिक्षण केंद्रामार्फत योग प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. या प्रशिक्षण केद्रातील मुलांना माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्यातर्फे योगा सूट मोफत देण्यात आले. तसेच योग प्रशिक्षण घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमात सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या मुलांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
या वेळी माजी नगरसेवक भालेकर यांनी मुलांना स्पर्धेच्या युगामध्ये शालेय शिक्षणाबरोबरच आरोग्य महत्वाचे असल्याचे सांगितले. त्यासाठी योग प्रशिक्षक दिनेश काळे व त्यांच्या संस्थेच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी प्रेरणा योग प्रशिक्षण केंद्राचे संचालक दिनेश काळे, माया भालेकर, साक्षी तोंडशाळ, माधवी जाधव व परिसरातील महिला वर्ग व पालक उपस्थित होते.
रुपीनगर : प्रेरणा योग प्रशिक्षण केंद्रातील मुलांना योगा सूटचे वाटप करताना माजी नगरसेवक प्रवीण भालेकर व मान्यवर.
