महाराष्ट्र न्यूज
पिंपरी, दि. ५ – कुदळवाडी भागात मोफत बी.सी.जी. लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम ज्यांचे वय वयवर्षे 60 पूर्ण आहे जे टी. बी. चे रुग्ण आहेत व टी. बी. रुग्णांच्या संपर्कात होते. तसेच ज्यांचे वय 18 पूर्ण आहे ते नागरिक व्यसन करणारे (मद्यपान, धूम्रपान) शुगर पेशंट – अठरा वर्षावरील सर्व जे प्रौढ आहे परंतु ज्यांचा बीएमआय अठरा आहे ह्या सर्व नागरिकांसाठी आमदार महेशदादा लांडगे युवा मंच अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यानी नियोजन केले होते.

विशेष सहकार्य आकुर्डी हॉस्पिटल – वैद्यकीय विभाग यांनी केले. यावेळी अनेक नागरिकांना लसीचा लाभ घेतला महिला ,जेष्ठ नागरिक, तरुण या सर्वांनी मोहीमेचा लाभ घेतला. कुदळवाडी परिसर निरोगी करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन दिनेश यादव यांनी केले होते.
